Sunday, July 21, 2024

Ahmednagar news: माजी आमदाराला मागितली 1 कोटीची खंडणी

अहमदनगर -तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप आहे व ती सोशल मिडीयावर प्रसारीत करुन तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी देवून 1 कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

आष्टीचे (जि. बीड) माजी आमदार भीमराव धोंडे यांनी याबाबत तक्रार दिली आहे. या प्रकरणी कल्पना गायकवाड (रा. अहमदनगर), महिला नामे बांगर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही), इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर (रा. अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी संगनमत करुन तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप आहे. ती सोशल मिडीयावर प्रसारीत करुन, तुमची बदनामी करुन तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु व तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी देवून फिर्यादीकडे 1 कोटी खंडणीची मागणी केली तसेच फिर्यादीचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून आरोपी इस्माईल दर्यानी उर्फ भैय्या बॉक्सर याने 25 हजार रुपये रोख रक्कम स्वीकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जानेवारी 2024मध्ये आष्टी येथील संपर्क कार्यालयात आलेल्या बांगर या महिलेने मला सांगितले की, तुमची एक अश्लील व्हिडीओ क्लिप माझ्याकडे आहे. ती क्लीप कल्पना गायकवाड मॅडमने मला दिलेली आहे. त्यांना सांगितल्याशिवाय ती क्लिप तुम्हाला दाखवणार नाही. ही क्लिप सोशल मिडीयावर प्रसारीत करायची नसेल तर कल्पना गायकवाड मॅडमच्या मागणीनुसार तुम्ही माझ्याकडे 1 कोटी रुपये द्या. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये मला फोन आला व फोनवर मी कल्पना गायकवाड बोलत आहे. माझ्याकडे तुमचे काही अश्लील व्हिडीओ क्लिप आहे. ही क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल करील. तुम्ही माझ्याकडे किंवा मी पाठविलेल्या बांगर महिलेकडे एक कोटी रुपये द्या, अशी मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles