Saturday, May 18, 2024

महिलेची जमीन बळकावल्या प्रकरणात, नगरच्या उद्योगपतीसह अनेकांवर गून्हा दाखल

अहमदनगर : येथील खरेदीस प्रतिबंध असलेल्या इनाम वर्ग जमिनीची खरेदी करून आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांच्यासह महसूल आणि निबंधक कार्यालातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेतल्याने महिलेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार तेरा जणांविरूद्ध कट रचणे, बनावट कागदपत्रे तयार करणे यासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधूबाई मुरलीधर निकम (वय ७०, रा. निंबळक, ता. नगर) या आदिवासी महिलेने यासंबंधी फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर २०१० ते एप्रिल २०२४ या काळात विविध खरेदी खतांद्वारे या जमिनीची परस्पर खरेदी, विक्री, फेरखरेदी करण्यात आली आहे. यामध्ये आपली फसवणूक झाल्याची तक्रार निकम यांनी केली.
पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी अॅड. सागर पादिर यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गुन्हा दाखल करून तपास करण्याचा आदेश दिला. त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यामध्ये दिनेश भगवानदार छाबरिया, सरला भगवानदास छाबरिया, शिवाजीराव आनंदराव फाळके, आशीष रमेश पोखरणा, जयवंत शिवाजीराव फाळके, आकाश राजकुमार गुरनानी, माणिक आनंदराव पलांडे, अजय रमेश पोखरणा, गौतम विजय बोरा, नरेंद्र शांतिकुमार फिरोदिया, तलाठी हरिश्चंद्र देशपांडे, मंडल अधिकारी दिलीप जायभाय आणि दुय्यम निबंधक कार्यालयातील तत्कालीन संबंधित अधिकारी यांच्याविरूद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधूबाई निकम यांच्या अशिक्षितपणाचा आणि वृद्धापकाळाचा गैरफायदा घेत त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles