शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीत मोफत आरोग्य तपासणी तर रामवाडीत रंगला बाल आनंद मेळा
नगर : स्व. सागर भाऊ पठारे मित्र मंडळ व अहमदनगर महानगर पालिकेच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर झोपडपट्टी येथे पद्मविभूषण माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले तज्ञ डॉक्टरांकडून परिसरातील वंचित, गोरगरीब महिला, पुरुष, लहान मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. व्याधी मुक्त करणारी आरोग्य यंत्रणा थेट दारापर्यंत आल्याने शिबिरात सहभागी झालेल्यांचे चेहरे खुलले होते.
यावेळी माजी महापौर तथा राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, कार्याध्यक्ष नामदेव पवार, शहर उपाध्यक्ष सुदाम भोसले, प्रदेश सरचिटणीस अशोक बाबर, उद्योजक निलेश मालपाणी, प्रदेश सचिव फारूक रंगरेज, बालरोग तज्ञ डॉ. दिलीप बागल, सामाजिक कार्यकर्ते विशाल वाघमारे, नेत्ररोग तज्ञ डॉ. आशिष इंगळे, डॉ. शिल्पा चेलवा, डॉ. अश्पाक पटेल, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.गणेश मोहळकर, विशाल वाघमारे, प्रशांत वाकचौरे, सुरज साळवे, रतन भोसले आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करून शरद पवारांचा शेवटच्या घटकांसाठी काम करण्याचा संदेश कृतीत आणला आहे. आताच्या काळात आरोग्य सुविधा महागल्या आहेत. त्यामुळे वंचित गोरगरीब व्याधी अंगावर काढतात व भविष्यात मोठे दुष्परिणाम होतात. समाज सुदृढ व निरोगी राहण्यासाठी आरोग्य चळवळ उभारणी करणे आवश्यक आहे. साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत असून, त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले. याबरोबरच रामवाडी येथे बाळ आनंद मेळावा साजरा करण्यात आला. येथील बालकांना विविध खेळण्यांचा आनंद मिळवून दिला. त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून मनाला खूप समाधान लाभले अशा भावना कळमकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर, भाऊसाहेब उडानशिवे, फारूक रंगरेज, नामदेव पवार, सुदाम भोसले, उमेश भांबरकर, विकास धाडगे, सोमनाथ लोखंडे, मनोहर चकाले, विकास उडानशिवे, सनी साबळे, युनूस सय्यद आदि उपस्थित होते.