कर्जत : आदर्श आचारसंहिता प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची घटना कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे घडली आहे. याप्रकरणी आज कर्जत व जामखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक आक्रमक झाले होते. या कारवाईच्या निषेधार्थ सर्व ग्रामसेवकांनी सुमारे चार तास धरणे आंदोलन केले. प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनामध्ये व्ही. एस. बनाते, कैलास तरटे, युवराज ढेरे, श्याम भोसले, तात्यासाहेब ढोबे, चंद्रकांत तापकीर, प्रशांत सातपुते, डी. आर. राऊत, ए. एम. कोल्हे, रोहिदास कापरे, पी. एच. साबळे यांच्यासह एकूण सत्तर ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकरी नितीन पाटील यांना कर्जत जामखेड ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील ग्रामसेवक एन बी घेरडे यांच्यावर लोकसभा निवडणूक २०२४ मधील आचारसंहिता भंग प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये एक एप्रिल रोजी रात्री उशिरा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कर्जत जामखेड यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आचारसंहिता भंग प्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा, ग्रामसेवक संघटनेचे चार तास आंदोलन…
- Advertisement -