नगर (प्रतिनिधी)- शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आयटीआय महाविद्यालय जवळील शिवसेनेच्या मध्यवर्ती जिल्हा कार्यालयात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात स्व. अनिल राठोड अमर रहे! च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, कल्याणचे नगरसेवक दिलीप गायकवाड, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे, आकाश कातोरे, युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, नंदू बोरुडे, महेश देवकर, सचिन ठोंबरे, सुनील लालबोंद्रे, रवींद्र लालबोंद्रे, संजय छजलाणे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओंकार शिंदे, रोहित पाथरकर, अजित दळवी, सागर गलांडे, स्वप्निल भरड, राहुल गायकवाड, अक्षय ठाणगे, रामा ठोंबे, प्रल्हाद जोशी आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दिलीप सातपुते व आकाश कातोरे यांची जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. दिलीप सातपुते म्हणाले की, स्व. अनिल राठोड व शिवसेना यांचे अतूट नाते होते. जिल्ह्यात व शहरात शिवसेना वाढविण्याचे काम त्यांनी केले. हिंदुत्वाचा विचार त्यांनी रुजविला. त्यांच्याच विचाराने शहरात प्रत्येक शिवसैनिक कार्य करत असून, शहराला त्यांचेच विचार तारु शकणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी स्व. अनिल राठोड यांच्या स्मृतीस अभिवादन करुन, स्व. राठोड यांनी राजकारणात राहून समाजकारणाचे काम केले व सर्वसामान्यांना आधार दिल्याचे सांगितले. कातोरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
दिलीप सातपुते व आकाश कातोरे जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य..
- Advertisement -