राज्य सरकारची महत्वाकांक्षी ठरलेल्या बहिण माझी लाडकी योजनेत आतापर्यंत 7 लाख 8 हजार महिलांचे अर्ज ऑनलाईन नारीशक्ती दूत अॅपवर नोंदवले गेले आहेत. या दाखल अर्जापैकी पडताळणीत एकट्या नगर जिल्ह्यात 6 लाख 600 महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत. दरम्यान, अजून एक लाखांच्या जवळपास ऑफलाईन अर्ज नारीशक्ती दूत अॅपमध्ये नोंदणी होणे बाकी आहेत.
जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी सुट्टी असताना नगर मुख्यालयासह तालुका पातळीवर तयार करण्यात आलेल्या वॉर रुममध्ये तीन शिफ्टमध्ये 30 ते 50 कर्मचारी यांनी रात्रंदिन करून ऑनलाईन अॅपवर दाखल 7 लाख 8 हजार महिलांच्या अर्जापैकी सोमवारी सांयकाळी 5 वाजेपर्यंत 6 लाख 600 अर्जांची पडताळणी पूर्ण केलेली आहे. तसेच हे सर्व अर्ज योजनेसाठी पात्र ठरलेली आहेत.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ही योजना प्रभावरी राबवण्यासाठी दाखल अर्जाची तातडीने पडताळणी करण्यासाठी तालुका पातळीवर वॉर रुम सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.