Saturday, March 2, 2024

लोकसभा लढवण्याचे निश्चित नाही…पक्षादेश महत्वाचा..आ.निलेश लंकेंनी भूमिका बदलली

नगर : कोणत्याही परिस्थितीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांनी जाहीर केलेल्या घोषणेत ‘ध’चा ‘मा’ झाला. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू अशा शब्दांत पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार नीलेश लंके यांनी मंगळवारी केले.

आमदर लंके यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ह्यशिवस्वराज्य यात्राह्ण आयोजित केली होती. त्याचा समारोप आज नगर शहरात झाला. यात्रेत आमदार लंके सहभागी झालेले नव्हते. मात्र ते नगर शहरातच उपस्थित होते. पुणे रस्त्यावरील सक्कर चौकातून सुरू झालेली यात्रा ढोल-ताशांच्या गजरात ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची आरती करून बसस्थानकजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी श्रीमती लंके यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर पत्रकारांनी आमदार लंके यांची भेट घेतली असता, त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी यात्रा काढण्याचा, निवडणूक लढवण्याचा निर्णय पत्नी राणी लंके यांचा होता. परंतु त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला, असा दावा आमदार लंके यांनी केला.

प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात, तसा तो आमच्यातही आहे व त्यांचा (राणी लंके यांचा) तो मतप्रवाह आहे, असे स्पष्ट करून आमदार लंके म्हणाले, मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे व पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो. मात्र, लोकसभेच्या माझ्या उमेदवारीबाबत मला विचारणाही झाली नाही व कोणाशी माझी चर्चाही झालेली नाही.

रविवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांचा आपल्याला दूरध्वनी आला होता, पण त्यादिवशी मी बाहेर असल्याने मेळाव्यात सहभागी झालो नाही, असे स्पष्ट करून आमदार लंके म्हणाले, माझ्याबद्दल कोणी काय भाष्य करावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ते मोठे आहेत व मी छोटा आहे. कोणी काय केले, ते पाहण्यात वेळ खर्च न करता त्याकडे दुर्लक्ष करतो व माझ्या पद्धतीने काम करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles