महायुतीच्या मेळाव्यादरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विक्रम वेताळ असा उल्लेख करत केलेल्या टीकेला आमदार रोहित पवार यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. या टीकेला उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजप सोबत गेल्याने व्हायरसची लागण झाली आहे असा टोला लगावला आहे.
महायुतीचे नेते जर खालच्या पातळीवर बोलत असतील तर आम्ही देखील पुढे काय करायचं ते ठरवू असा इशारा देखील रोहित पवारांनी दिला आहे.अजित पवार गटाचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत, असा गौप्य स्फोट देखील रोहित पवार यांनी केला. अजित पवार गटातील अनेकांना भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल असं रोहित पवार म्हटले आहेत.
महायुतीकडून राज्यभर सुरू असलेल्या मेळाव्यांना देखील त्यांनी लक्ष्य केलं. ‘महायुतीच्या नेत्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील. कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेला पटलेली नाही. ती पटवून देण्याचा प्रयत्न ते महायुती मेळाव्याच्या माध्यमातून करत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.