येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुका आहेत. त्यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे, यामुळे त्यांच्या या दौऱ्याला एक राजकीय महत्व देखील प्राप्त झाले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी देखील नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता त्यापाठोपाठ अजित पवार देखील जिल्ह्यावर लक्ष ठेवून आहे. आपल्या दौऱ्यात अजितदादा हे अनेक ठिकाणी भेटीगाठी घेणार आहे.
अजित पवारांच्या दौऱ्यावर बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, नेत्यांचे दौरे हे येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने सुरूच असतात. निवडणुका जवळ आल्या की नेतेमंडळी भेटीगाठी घेत असतात. यामुळे याला राजकीय दौरा म्हणता येणार नाही, असं जगपाप म्हणाले.
येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहराच्या जागेची मागणी भाजपकडून केली जात आहे. याविषयी विचारले असता जगताप म्हणाले, राज्यात महायुती आहे. यामुळे एकटे अजित पवार नगर शहराच्या जागेबाबत काही निर्णय घेऊ शकत नाही. या जागेचा येणाऱ्या काळात एकत्र विचार करून यावर निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जगताप यांनी दिली. तसेच देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणी जागेवर दावा केला असेल तर यामध्ये काही गैर नाही. मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातात, असं जगताप म्हणाले.