Sunday, July 14, 2024

आम्ही नाही तुम्हीच राष्ट्रवादीत या…आ.जगताप यांची खा. विखेंच्या ऑफरवर प्रतिक्रिया…

भाजप खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम जगताप यांना भाजपमध्ये येण्याचा आमंत्रण दिलं आहे. त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी देखील विखे विनोदाने बोलत असले तरी आम्ही त्याला गांभीर्याने घेतो. आम्ही काही तिकडे येत नाही पण तुम्हीच राष्ट्रवादीत यावं असे आमंत्रण आमदार जगताप यांनी विखेंना दिले. तसेच विखेंनी राष्ट्रवादीकडूनच पुढची लोकसभा लढवावी असे आवाहनही संग्राम जगताप यांनी केलंय. शब्दगंध साहित्य कार्यक्रमात सुजय विखे यांनी माजी आमदार अरुण जगताप आणि आमदार संग्राम जगताप या पिता पुत्रांना भाजप सेनेचा आव्हान केलं होतं. त्यावर आमदार संग्राम जगताप यांनी पलटवार केलाय.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles