Saturday, December 7, 2024

लोकसभा लढवण्यास सज्ज, आ.प्रा. राम शिंदे यांचा पुनरुच्चार, पक्षाच्या निर्णयाची प्रतिक्षा

विधान परिषदेचे आमदार प्रा.राम शिंदे यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ‘मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे गेल्या वर्षभरापासून सांगत आहे. वेळोवेळी माझी भूमिका मांडली आहे. आता फक्त तिकीट मिळण्याची वाट पाहत आहे,’ असं शुक्रवारी प्रा. राम शिंदेंनी नगर शहरात माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं. त्यामुळे आता नगर दक्षिणचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यांनी सांगितलं की, मी एक वर्षभरापूर्वीच लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे. २०१४ मध्ये लोकसभेचे तिकीट मागितले होते, परंतु ते मला मिळाले नाही. २०१९ ला मला पक्ष तिकीट देत होता, तेव्हा मी ते घेतले नाही. पण २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मी तयार आहे, असं मी एक वर्षभरापूर्वीच सांगितलं आहे. माझा हा संदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंत गेला आहे. आता माझे फक्त वेटिंग फॉर तिकीट सुरू आहे. लोकसभा तिकीटाबाबतचा विषय हा मीडियासमोर बोलण्याचा नाही. परंतु मी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मी या जिल्ह्याचा सलग पाच वर्ष पालकमंत्री राहण्याचा रेकॉर्ड माझ्या नावावर आहे. त्याकाळात मी चांगले काम केले असून तसे लोकही म्हणतात. त्यामुळे आता मला लोकसभा निवडणुकीची तिकीट देण्याबाबत काय भूमिका घ्यायची हे पक्ष ठरवेल,’ असेही शिंदे म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles