अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील गैरकारभाराविरोधात खासदार निलेश लंके यांनी सोमवारी (दि.22 जुलै) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषणाला प्रारंभ केले. प्रारंभी भ्रष्टाचाराची मडकी घेऊन उपोषणकर्ते मोर्चाने पोलीस अधीक्षक कार्यालयात समोर दाखल झाले होते. यामध्ये महाविकास आघाडीतील राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून त्रस्त झालेल्या नागरिकांनी देखील सहभाग नोंदवला.
आज आम्ही प्रातिनिधिक मडकी फोडतोय, भ्रष्टाचाराचा पापाचा मडका आता भरलेला आहे, आजपासून ते फोडायला आम्ही सुरवात करतोय, या हप्त्यांचा त्रास सर्वसामान्य जनतेला सोसावे लागत आहे, कोणतेही काम पैशाशिवाय होत नाही, याला वाचा फोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही – खासदार निलेश लंके