Saturday, January 25, 2025

दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या खा. सुजय विखे यांच्याकडे संपत्ती किती?

नगर : नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी शपथपत्रात जंगम व स्थावर अशी एकूण वैयक्तिक मालमत्ता २३ कोटी ११ लाख ४० हजार ४७८ रुपये असल्याचे जाहीर केले आहे. पाच वर्षांपूर्वीच्या, सन २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी आपली मालमत्ता ११ कोटी १७ लाख ५६ हजार ४३९ असल्याचे उमेदवारी अर्जात नमूद केले होते.

म्हणजे पाच वर्षांत त्यांच्या वैयक्तिक संपत्तीत ११ कोटी ९३ लाख ९४ हजार ३९ रुपयांची वाढ झाली आहे. उमेदवार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांची ५ कोटी ८२ लाख २ हजार २६३ रुपये एवढी मालमत्ता जाहीर केली आहे तर सुजय विखे यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन व्यक्तींच्या नावावर एकूण ९९ लाख २६ हजार २४८ रुपयांची मालमत्ता आहे.

पाच वर्षांपूर्वी सुजय विखे प्रथमच खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या एकूण वैयक्तिक संपत्तीत ११ कोटी ९३ लाख ८४ हजार ३९ रुपयांची भर पडली आहे. तर पत्नी धनश्री विखे यांची मालमत्ता अवघी ६९ हजार १९४ रुपयांनी वाढली आहे. सुजय विखे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यासोबत जोडलेल्या शपथपत्रात आपली वैयक्तिक, पत्नीची व अवलंबून असलेल्या व्यक्तींची एकूण संपत्ती जाहीर केली आहे.

डॉ. सुजय विखे यांची जंगम मालमत्ता सन २०१९ मध्ये ४ कोटी ९१ लाख ७६ हजार ९९६ रुपये होती. ती आता सन २०२४ मध्ये १० कोटी ९५ लाख ७० हजार ८९३ इतकी दाखवली आहे. गेल्या निवडणुकीतील शपथपत्राप्रमाणेच यंदाही त्यांनी स्वमालकीचे वाहन नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांच्याकडे ५४१.१२० ग्रॅम सोने आहे. पत्नी धनश्री विखे यांच्याकडे सन २०१९ मध्ये ३ कोटी ९५ लाख ९८ हजार २७० रुपयांची जंगम मालमत्ता होती. ती आता सन २०२४ मध्ये ३ कोटी ८८ लाख ३२ हजार ८२३ आहे. त्यांच्याकडेही वाहन नाही तर आता ६९०.६७४ ग्रॅम सोने आहे.

स्थावरमध्ये डॉ. सुजय विखे यांच्याकडे सन २०१९ मध्ये ६ कोटी २५ लाख ७९ हजार ४४३ रुपयांची मालमत्ता होती. ती आता १२ कोटी १५ लाख ६९ हजार ५८५ झाली आहे. पाच वर्षांतील ही वाढ ५ कोटी ८९ लाख ९० हजार १४२ रुपयांची झाली आहे. पत्नी धनश्री विखे यांच्याकडे सन २०१९ मध्ये १ कोटी ११ लाख ५४ हजार ८१६ रुपयांची मालमत्ता होती. ती आता १ कोटी १९ लाख ८९ हजार ४४० एवढी झाली आहे. या संपत्तीमध्ये डॉ. विखे यांची ११ कोटी ९३ लाख ८४ हजार ३९ रुपयांनी तर धनश्री विखे यांची संपत्ती केवळ ६९ हजार १८४ रुपयांनी वाढली आहे.

डॉ. सुजय विखे यांच्यावर ३ कोटी ६४ लाख १३ हजार २०९ रुपये कर्ज आहे. त्यात २ कोटी २४ लाख १३ हजार २०९ प्रवरा सहकारी बँकेचे गृहकर्ज आहे तर १ कोटी ४० लाख रुपये अनिशा ट्रेडिंग कंपनीकडून उसनवारीने घेतले आहेत. या शपथपत्रात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसल्याचे नमूद केले आहे. त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील वैद्याकीय महाविद्यालय (पुणे) येथे वैद्याकीय शिक्षण पूर्ण केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles