निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. यावर भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मशाली घ्या तुतारी वाजवा. हवं तर त्यांना नव्या तुतारी देखील घेऊन देऊ. मात्र, आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पहाव लागेल, असे म्हणत विखे पाटलांनी शरद पवार गटाला डिवचलंय. ते अहमदनगर येथे बोलत होते.
सुजय विखे म्हणाले, चिन्ह देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय होता. आयोगाने चिन्ह वाटप केलेलं आहे पण अजूनही दुसऱ्या चिन्हावर आक्षेप घेतलं गेले आहे. मशालीवर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यामुळे जो पर्यत बैलेटवर चिन्ह येत नाही तो पर्यंत चिन्हावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही, असे सुजय विखे पाटील म्हणाले.