जसा उध्दव ठाकरे यांच्यावर परिणाम झाला आहे, तसाच रोहित पवार यांच्यावर देखील परिणाम झाला असल्याचे वक्तव्य करत राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीला आ. पवार हे देखील जबाबदार आहेत, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.खा. डॉ. विखे बुधवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
आ. पवार यांनी दहा ते पंधरा दिवसांत चित्र बदललेले दिसेल, सोडून गेलेले आमदार पुन्हा परततील असे वक्तव्य केले. त्याला प्रत्युत्तर देताना विखे म्हणाले, रोहित पवार यांच्यावर देखील परिणाम झाला आहे. कारण आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात रोहित पवार यांचाही मोठा वाटा आहे. कारण त्यांची राष्ट्रवादीमध्ये ‘मोनोपोली’ होती. ते जर म्हणत असतील आमदार परत येतील, मात्र ते येणार नाहीत आणि तोपर्यंत निवडणुका होऊनही जातील