नगर: नगर शहराच्या राजकारणाच्या झालेल्या गुन्हेगारीकरणाला कायमस्वरूपी आळा घालण्याच्या दृष्टीने नगर शहर विधानसभा मतदारसंघातून अशोक लांडे खून प्रकरणातील दोषी कोतकर कुटुंबीय यांना आणि केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी तुरुंगवास भोगलेल्या कोतकरांच्या संभाव्य उमेदवारीला नगरमधील ‘मविआ’चा विरोध
आघाडीचे नेते शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम,माजी महापौर भगवान फुलसौंदर, विक्रम अनिलभैय्या राठोड, माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पत्र पाठवले असून त्या पत्राद्वारे ही मागणी केली आहे.
नगर शहर महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना नेते खा. संजय राऊत, खा. निलेश लंके आदींना संयुक्त सह्यांचे हे निवेदन या पदाधिकार्यांनी पाठवले आहे.