Thursday, September 19, 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीवर प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या आदेशान्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठित करण्यात आली असून, या समितीच्या सदस्यपदी प्रा. माणिक विधाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिफारशीने विधाते यांची समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेची यशस्वी अंमलबजावणी होण्यासाठी विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठित करण्यात येत आहे. यामध्ये दोन अशासकीय सदस्यांना संधी देण्यात आली आहे.
प्रा. माणिक विधाते सन 1999 सालापासून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे क्रियाशिल सदस्य आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी शहर उपाध्यक्ष व शहर सरचिटणीस ही जबाबदारी सांभाळून सन 2017 ते जानेवारी 2024 पर्यन्त राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती देवस्थानचे विश्‍वस्त म्हणून ते काम पाहत आहे. शहर बँकेचे ते संचालक असून, सावित्रीबाई व महात्मा ज्योतीबा फुले स्मारक कृती समिती व अहमदनगर तायक्वांदो स्पोर्टस असोशिएशनचे अध्यक्ष तर जिल्हा क्रिकेट आसोशिएशनचे सहसचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. या नियुक्तीबद्दल त्यांना आमदार संग्राम जगताप व मा. आ. अरुणकाका जगताप यांनी शुभेच्छा दिल्या असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles