Sunday, July 21, 2024

विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला मिळतील, आ. संग्राम जगताप यांचा विश्वास

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- अजित पवार गटाचा नगर दक्षिण पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा प्रदेशाध्यक्ष खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी त्यांचे स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची प्रतिमा देऊन करण्यात आला.
या मेळाव्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे हात बळकट करत पुढील प्रत्येक निवडणुकीत एकजुटीने काम करत तळागाळापर्यंत पक्षाचे विचार पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी
पुढील विधानसभा निवडणुक मध्येही २०१९ प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून येतील हा ठाम विश्वास दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यामध्ये विविध भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये राहून केलेल्या विकास कामांचा प्रचार‌ करावा.उपमुख्यमंत्री अजितदादांनी नगर शहराच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. कार्यकर्त्यांनी आघाडी, महायुती याकडे लक्ष न देता पक्षाची सूचना येईल त्याप्रमाणे काम करावे. कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी.
यावेळी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली ताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नहाटा, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर जिल्हा अध्यक्ष रेश्मा ताई आठरे, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, कुमारसिंह वाकळे, दत्ता पानसरे, प्रा. माणिकराव विधाते, अभिजित खोसे, समद खान, भा कुरेशी, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles