नगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (शरद पवार गट) जेऊर गट शाखेचे उद्घाटन करुन गाव तेथे शाखा अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर शिवाजी निमसे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमातंर्गत नगर तालुक्यातील विविध गावामध्ये राष्ट्रवादीची नव्याने शाखा सुरु करण्यात आली.
या अभियानाप्रसंगी शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, ससेवाडी, बहिरवाडी, जेऊर, इमामपूर, खोसपुरी, पांगरमल, उदरमल, डोंगरगण, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, चापेवाडी आदी गावातील ग्रामस्थ, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावागावात पक्षाच्या शाखेचे फलक लावून त्याचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी धनगरवाडीचे सरपंच किशोर शिकारे, बाबाजी आवारे, संतोष पठारे, तुषार नवाळे, सचिन कराळे, निलेश कराळे, ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब चव्हाण, आकाश निमसे, वैभव निमसे, तुषार पालवे, गणेश पालवे, सुशांत पालवे, भालेराव कदम, सागर गुंड, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष भैय्या पवार, दत्तू रोकडे, सागर मगर, बापू इंगळे, म्हस्के पाटील, श्रीराम दाने, अनिल दाने, महेश कराळे, गोविंद कालापहाड, प्रवीण जावळे, संतोष कदम, अनिल वारुळे, अविनाश जावळे, कय्युम शेख, सरपंच गणेश आव्हाड, चेतन काळे आदी उपस्थित होते.
नगर तालुक्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अभियान, गाव तिथं शाखा….
- Advertisement -