Sunday, May 19, 2024

पंतप्रधान नगरला सभा घेतायत यातच माझा गुलाल फिक्स… निलेश लंके यांची टिप्पणी…

नगर: निलेश लंके यांनी विखे पाटलांच्या गुंडाराज टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, गुंडाराज कुणाचे हे सर्व जनतेला माहिती आहे. राहात्यात (विखेंचा मतदारसंघ) जाऊन पाहा गुंडाराज. कार्यकर्त्यांनी व्हॉटस्अप स्टेटस ठेवला तरी मारहाण केली जाते. माझ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक गुन्हा दाखल. गुंडाराज यांचाच असून पोलिस प्रशासनाचा वापर केला जातो, त्यामुळे जनता यांनाच दाखवून देईल, असा इशाराही निलेश लंकेंनी दिला आहे.

पंतप्रधान इथे येणार, यातच माझा गुलाल फिक्स
अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होतेय, इथेच माझा विजय झाला. माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या विरोधात देशाचे पंतप्रधान आणि अनेक नेते येत आहेत, त्यामुळे माझा गुलाल फिक्स आहे. आपण प्रधानमंत्र्यांना टीव्हीवरच बघत होतो, आता ते माझ्या विरोधात येतायत, यावरूनच कळतंय आपली किती ताकद वाढलीय, असा मिश्किल टोला लंकेंनी लगावला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles