Wednesday, April 17, 2024

जुन्या पेन्शनसाठी सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचे एक तासाचे ‘वॉक आऊट’

कार्यालया समोर निदर्शने करुन वेधले केंद्र व राज्य शासनाचे लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शनच्या मागणीसाठी व खाजगीकरण कंत्राटीकरण धोरणाच्या निषेधार्थ शहरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.16 फेब्रुवारी) एक तासाचे वॉक आऊट करुन कार्यालया बाहेर निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने पुकारलेल्या एक दिवसीय संपाच्या पार्श्‍वभूमीवर या संपाला पाठिंबा देण्यासाठी शहरात सदरचे आंदोलन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर शाखेचे अध्यक्ष सुभाष तळेकर व राज्य सरचिटणीस रावसाहेब निमसे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, नगर तहसिल कार्यालय, पॉलिटेक्निक महाविद्यालय, आयटीआय, सार्वजनिक पाटबंधारे आदी सरकारी, निमसरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी एक तासाचे वॉक आऊट करुन निदर्शने केली. प्रलंबित प्रश्‍नांकडे केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कर्मचारी वर्ग उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार कर्मचाऱ्यांसाठी कोणतीही तरतूद किंवा सवलत दिलेली नाही. खाजगीकरण कंत्राटी करण्याच्या धोरणाशी संबंधित असलेला पीएफआरडीए कायदा रद्द होणे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करणे, कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे याबाबत कोणताही निर्णय न घेता जीवघेणी भाववाढ रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे संताप व्यक्त करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सदरचे आंदोलन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वसामान्य जनतेसह कामगार, कर्मचारी वर्ग असह्य भाववाढीमुळे नागावला जात आहे. आयकरासह इतर अनेक सुसह्य सवलती न दिल्या गेल्यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमान खालावले आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरणामुळे बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक जटील झाला आहे. आठव्या वेतन आयोग संदर्भात कोणताही हालचाल दिसत नाही. केंद्र शासनाच्या या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व जिव्हाळ्याच्या उपरोक्त प्रश्‍नांवर शासनाचा लक्षवेधण्यासाठी देशभरातील 60 लाख राज्य सरकारी कर्मचारी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे नेतृत्वाखाली देशव्यापी संपात उतरले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles