Thursday, July 25, 2024

पांगरमल घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी व्हावी..पोलिस अधिक्षकांना निवेदन

नगर- पांगरमल येथे चोर समजून झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी असून, त्यामध्ये काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपींना अटक करण्यापुर्वी योग्य ती चौकशी करुनच पुढील कार्यवाही करावी. या मागणीचे निवेदन पांगरमल ग्रामस्थांच्यावतीने पोलिस अधिक्षकांना देण्यात आले. पोलिस उपाधिक्षक संपतराव भोसले यांनी स्विकारले. याप्रसंगी माजी सरपंच भिमराज आव्हाड, उपसरपंच कविता आव्हाड, रावसाहेब आव्हाड, राहुल सांगळे, अमित आव्हाड, नवनाथ आव्हाड, भास्कर आव्हाड, भागिनाथ आव्हाड, माजी सभापती भरत आव्हाड, संजय आव्हाड, श्रीधर आव्हाड, पंढरीनाथ आव्हाड, अभिषेक आव्हाड, हरिभाऊ आव्हाड, विमल आव्हाड, मिना आव्हाड, पुजा आव्हाड, सारिका आव्हाड, सुभद्रा आव्हाड, लक्ष्मी आव्हाड, उज्वला आव्हाड आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पांगरमल येथील घटनेमुळे संपूर्ण पांगरमल ग्रामस्थ दहशतीखाली आहेत. ग्रामस्थ प्रशासनास सहकार्य करण्यासाठी तयार आहे. विनाकरण पोलिसांकडून कोणत्याही ग्रामस्थांना नाहक त्रास दिला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती निवेदनात केली आहे.

याप्रसंगी भिमराज आव्हाड म्हणाले, पांगरमल गावात विशिष्ट समाजाचे कायम भांडणे होत असतात, या भांडणामधूनच त्यांच्या-त्यांच्यात शेळी चोरण्याच्या संशयावरुन हाणामार्‍या होऊन तरुणाचा जीव गेला. घटना घडली म्हणून गावातील लोक पाहण्यासाठी गेले असता, त्यांचे व्हिडिओ व फोटो काढून पोलिसांकडे गावातील तरुणांची नावे या घटनेशी जोडून देण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनस निवेदन देऊन कोणावरही अन्याय होणार नाही, अशी मागणी केली असल्याचे सांगितले.

यावेळी पोलिस उपाधिक्षक संपतराव भोसले यांनी निवेदन स्विकारुन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. व सदर घटनेचा योग्य तो तपास केला जाईल, असे सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles