पारनेर तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असल्याने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने चारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या चाऱ्याचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पशुपालकांना करण्यात आले.






