महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटील म्हणाले की, आमच्या मुलाचा किती छंद पुरावायचा, काय करायचं, हे मला बाळासाहेबांनी शिकवण्याची गरज नाही. तुम्ही आपल घरदार राजकारणात उतरवलच आहे. तुमच्या घरातल्या मुला-मुलींचा छंद पुरवला तो चालतो. दुसऱ्याच्या मुलाची का काळजी करता तुम्ही? संगमनेरमध्ये दहशतीच राजकारण फार वेळ चालणार नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी बाळासाहेब थोरातांना दिले आहे.
सुजय विखे यांच्या उमेदवारीबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डॉ. सुजय स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मनात काय विचार केला त्यावर चर्चा नाहीए. पण जो निर्णय घेईल तो योग्यच असला पाहिजे. तालुक्यात हुकूमशहा तयार झालाय. तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलाय. ठराविक लोकांचा विकास झालाय. तालुक्याचं काय झालंय? तालुक्याला नवीन चेहरा हवा, अशी आता लोकांची भावना झालीय. लोकभावनेचा काय आदर करायचा हे सर्व पक्ष श्रेष्ठींना कळवू. ते निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.