Friday, March 28, 2025

नगर जिल्ह्यात ७ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश…’या’ गोष्टींना मनाई

*जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी*

नगर दि.२३- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये २४ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे.

सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles