– ग्रामविकास अधिकाऱ्यास – लुटले; भावाला मारहाण
रोख रक्कम घेतली काढून
नगर : रस्त्यावर चारचाकी वाहन – अडवून मी या गावचा दादा आहे, असे म्हणून एका आरोपीने ग्रामविकास अधिकाऱ्यास दमदाटी – करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून घेतली. तसेच त्यांच्या भावाला मारहाण केली. ही घटना दि. १५ रोजी पिंपळगाव रोडवर घडली. प्रभाकर सोमा चव्हाण (वय ५६, रा. संक्रापूर) हे राहुरी खुर्द येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून नोकरी करतात. दि. १५ रोजी सायंकाळी प्रभाकर चव्हाण व त्यांचे भाऊ चारचाकी वाहनातून घरी जात होते. कोल्हार ते बेलापूर रोडवरील
पिंपळगाव येथे आरोपीने चव्हाण यांची गाडी अडवून गाडीची चावी काढून फेकून दिली. त्यानंतर चव्हाण यांना दमदाटी करून ७ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली.
चव्हाण यांचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता, आरोपीने त्यांनाही मारहाण केली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सनी विजय बनसोडे (रा. पिंपळगाव फुणगी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.