Thursday, September 19, 2024

Ahmednagar news :सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्‍याला मारहाण, पोलिसाचा मृत्यू

अहमदनग-राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर काल दुपारच्या सुमारास मायलेेकाच्या मारहाणी दरम्यान एका 68 वर्षीय सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्‍याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहुरी खुर्द येथील शनिशिंगणापूर फाट्यावर काल दि. 22 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान एक महिला व एक तरुण सुखदेव किसनराव गर्जे, वय 68 वर्ष, रा. अकोला, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर या सेवानिवृत्त पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करीत होते. तरुणाने सुखदेव गर्जे यांना हेल्मेटने मारहाण केल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.

मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे हे खाली पडले आणि जागेवर गतप्राण झाले. त्यांना तातडीने राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबासाहेब शेळके, प्रवीण बागुल, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रमोद ढाकणे, आजिनाथ पाखरे, राजेंद्र नागरगोजे, महिला पोलिस कर्मचारी कुसळकर आदि पोलीस पथकाने ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

पोलिस पथकाने ताबडतोब एक महिला व तिच्या मुलाला ताब्यात घेतले. 15 दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील मांजरी येथे सोन्याचे दागीने लुटण्यासाठी एका वृद्ध महिलेची हत्या करण्यात आली होती. सदर घटना ताजी असतानाच आज मारहाणी दरम्यान सुखदेव गर्जे या सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुखदेव गर्जे यांचा मृत्यू मारहाण केल्यामुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे याचा तपास राहुरी पोलिस पथकाकडून सुरु आहे. राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गर्जे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात पाठवला आहे. अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles