नगर – शहर हे विकास कामातून बदलत असून हे आता नगरकर बोलू लागले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून १५० कोटी रुपये मंजूर करून आणले असून त्यातील केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड या पहिल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भविष्यकाळात सर्वांगीण विकास कामातून नगर शहर समस्या मुक्त होणार असून रिझल्ट देण्याचे काम सुरू आहे आतापर्यंत कोणाच्या काळात जास्त कामे झाले आहेत याची माहिती जर कोणाला मागायची असेल तर त्यांनी मागावी त्यामध्ये आमदार संग्राम जगताप हेचं नाव घेतले जाईल सर्वांना बरोबर घेऊन पक्ष विरहित विकास कामे सुरू आहेत असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोड पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, आयुक्त यशवंत डांगे, माजी नगरसेवक संजय चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, नेहूल भंडारी, रमेश गुंदेचा, अमोल मुथीयान, जनक अहुजा, अनिश अहुजा, शहर अभियंता मनोज पारखे, इंजि श्रीकांत निंबाळकर, शशिकांत नजन, आदि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की केडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक राज्य सरकारचा जीएसटी आणि महापालिकेचा कर रुपी टॅक्स भरत असतानाही या परिसरात विकास कामे झाली नाही मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीच ही विकास कामे मंजूर झाली होती काही लोकांनी या कामांमध्ये खोडा घातल्यामुळे ती होऊ शकली नाही आता या परिसरातील बहुतांश रस्त्याची कामे मार्गी लागणार आहे.
राज्य शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजने तून शहराच्या विकास कामासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून यामध्ये माऊली संकुल ते गंगा उद्यान ते औरंगाबाद रोड जिल्हाधिकारी ऑफिस पर्यंत रस्त्याचे रुंदीकरणासहित विकसित करणे, सर्वमंगल कार्यालय ते भिंगारणाला रस्त्याचे रुंदीकरणा सहित विकसित करणे, लिंक रोड ते औद्योगिक वसाहत पर्यंत रस्त्याचे काम करणे, झिंजुर्डे घर ते ज्येष्ठ नागरिक भवन ते सीना नदीपर्यंत रस्ता विकसित करणे, अष्टविनायक आपारमेंट ते टेलीफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकविरा चौक ते सिटी प्राईम हॉटेल ते तपोवन रोड रस्ता विकसित करणे, पाऊलबुद्धेशाळा ते शिरसाठ मळा रस्ता विकसित करणे, मुकुंदनगर सी.आय.व्ही कॉलनी रस्ता विकसित करणे, भिंगार नाला विकसित करणे, भवानीनगर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते औसरकर मळा ते साळुंखे मळा रोड विकसित करणे, बुरडगाव रोड नक्षत्र लॉन ते वकोडी रोड या रस्त्याला जोडणारा रस्ता विकसित करणे, माळीवाडा वैस ते पंचपीर चावडी ते माणिक चौक भिंगारवाला चौक सर्जेपुरा चौक ते पेशवाई शॉप रस्ता विकसित करणे, पत्रकार चौक ते अप्पूहत्ती चौक लालटाकी ते न्यू आर्टस् कॉलेज पर्यंत रस्ता विकसित करणे, नगर वाचनालय ते गांधी मैदान आनंदी बाजार ते गाडगीळ मैदान ते अमरधाम रोड पर्यंत रस्ता विकसित करणे, जुने आरटीओ समोरील रस्ता विकसित करणे बोल्हेगाव सुरेश वाडमोडे घर ते आढाव घर ते विलास वाटमोडे दुकान ते समृद्धी पार्क पर्यंत रस्ता विकसित करणे, दिल्लीगेट ते बागरोजा हडको चौक ते नेप्ती नाका चौक रस्ता विकसित करणे, दिल्ली गेट सुपेकर मेडिकल ते मसाले घर टोणपे घर ते घोरपडे हॉस्पिटल पर्यंत रस्ता विकसित करणे, जीपीओ चौक धरती चौक ते मार्केट यार्ड चौक कल्याण रोड डेरी रोड पर्यंत रस्ता विकसित करणे, गोविंदपुरा नाका ते गोविंद पूर पोलीस चौकीपर्यंत रस्ता विकसित करणे, तपोवन रोड ज्ञानेश्वरी ब्युटी पार्लर ते राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन पर्यंत रास्ता विकसित करणे, श्यामसुंदर पॅलेस ते हिवाळे घर ते तवले ओढा हिम्मतनगर पर्यंत रस्ता विकसित करणे, सारसनगर बाळू वाकडे पिठाची गिरणी ते साईनगर ते छत्रपती नगर पर्यंत रस्ता विकसित करणे, यशोदा नगर जरीवाला बिल्डिंग ते चंचल निवास स्नेहल ट्रेडर्स ते सपकाळ हॉस्पिटल ते किंग कॉर्नर पर्यंत रस्ता विकसित करणे, प्रोफेसर कॉलनी चिन्मय शॉप ते अवतार मिनी मार्केट ते संत निरंकारी भवन ते गंगा उद्यान पर्यंत रस्ता विकसित करणे, अशी एकूण 17 किलोमीटर पर्यंतची रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली