Saturday, December 9, 2023

माळी समाजासाठी २ एकर जागा…सकल समाजातर्फे आ. जगताप यांचा सत्कार!

सकल माळी समाजाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार संपन्न

जागेच्या माध्यमातून समाजासाठी चांगले काम उभे करा – आमदार संग्राम जगताप

नगर : सकल माळी समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी माजी नगरसेवक किशोर डागवाले यांनी समाजाला एकत्रित करीत पाठपुरावा सुरू केला आहे. सर्वांच्या सहकार्यातून प्रश्न मार्गी लागत असतात. यासाठी पाठपुरावा महत्त्वाचा असतो. सकल माळी समाजाचे विविध कार्यक्रम पार पडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून दोन एकर जागा उपलब्ध करून दिले आहे. तसा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पारित झाला असून त्यात ठरावाची कॉपी घेऊन राज्य शासनाकडून मंजूर करून आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडत आहे. समाजाला मिळालेल्या जागेच्या माध्यमातून चांगले काम उभे करावे लागणार आहे. या माध्यमातून समाज एकत्रित येण्याचे काम होते. जागेचा उपयोग लोक कल्याणासाठी होणे गरजेचे आहे. सारसनगर परिसराला सावित्रीबाई फुले नगर असे नामकरण झाले असून महात्मा फुले चौक येथे लवकरच भव्य कमान उभारली जाणार आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून काम मार्गी लागत असते. आभारापेक्षा पाठपुराव्याला अधिक महत्त्व आहे. समाजामध्ये चांगले काम करीत असताना विघ्न संतोषी लोक खोडा घालण्याचे काम करतात त्याकडे आपण दुर्लक्ष करीत जनतेची कामे मार्गी लावत आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
सकल माळी समाजाला महापालिकेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमासाठी दोन एकर जागेचा ठराव मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक किशोर डागवाले, प्रा. माणिकराव विधाते, बाजार समितीचे संचालक संतोष मस्के, बाळासाहेब भुजबळ, डॉ,सुदर्शन गोरे, दीपक खेडकर, रेखा विधाते, रोहिणी बनकर, किरण कोतवाल, कल्याणी गाडळकर, ब्रिजेश ताठे, भानुदास बनकर, अनिल कानडे, अभिषेक चिपडे, प्रकाश इंगळे, नारायण इंगळे, रामचंद्र व्यवहारे, अनुप कानडे, इंजिनिअर चंद्रकांत पुंड, सुधीर पुंड, मच्छिंद्र बनकर, सुरेश कावळे, अमोल भांबरकर, एडवोकेट राहुल रासकर, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, डॉ. रणजीत सत्रे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक किशोर डागवाले म्हणाले की, सकल माळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे मोठे सहकार्य लाभत असते. समाजाला मिळालेल्या जागेचा उपयोग समाजाच्या चांगल्या कामासाठी नक्कीच होईल. महात्मा फुले चौक येथे सावित्रीबाई फुले नगर नामकरण प्रवेशद्वाराची कमान आमदार संग्राम जगताप मार्गी लावणार आहेत असे ते म्हणाले.
तसेच डॉ. सुदर्शन गोरे, बाळासाहेब भुजबळ, प्रा. माणिकराव विधाते आदींची भाषणे यावेळी झाली. यावेळी राहुल रासकर यांनी आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d