Thursday, March 27, 2025

अहमदनगरच्या नामांतरास विरोध, प्रस्ताव रद्द करण्याची मागणी

नगर – 28 मे 1490 साली अहमदनगरची स्थापना झाली. ज्या शहर व जिल्हयाला 534 वर्षाचा प्रदिर्घ असा इतिहास असुन जगात सर्वत्र अहमदनगर प्रसिध्द असुन त्याचा क्षणातच बेकायदेशिरित्या घाईघाईने नामांतराचा प्रस्ताव महापालीका सभागृह विसर्जित असतांना एकटया आयुक्तांनी कोणत्या अधिकाराच्या व कोणत्या कायदयाअतंर्गत सदरचा बेकायदेशिर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे पाठविला, या बेकायदेशिर व मनमानी तसेच लोकशाहीला काळीमा फासुन हुकूमशाही प्रध्दतीने अचानक नामांतराचा प्रस्ताव पाठविणा-या आयुक्त जावळे व जिल्हा प्रशासनाचा समाजवादी पार्टी तर्फे तिव्र निषेध व्यक्त करुन तो प्रस्ताव रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

वास्तविक अहमदनगर शहारास 534 वर्षाचा जाज्वलय इतिहास असुन ज्याने हे शहर स्थापन केले त्याचेच नाव शहराला आहे. राज्यात औरंगाबाद, उस्मानाबाद या शहरांचे नामांतर अदयाप हाय कोर्टात प्रलंबित असतांना आयुक्तांनी कोणाला खुश करण्यासाठी किंवा कोणाच्या दबावाखाली हा ठराव पारित केला हे न उलगडणारे प्रश्न आहे. आयुक्तांच्या संशयास्पद कार्यपध्दतीचा समाजवादी पार्टी धिक्कार करीत आहे. मुळात आरक्षणाची वचनपुर्ती करु न शकल्याने एका समाजाची नाराजी दूर करण्यासाठी असे उपटसुंभ निर्णय जनतेवर लादले जात आहेत. खरे तर त्या समाजाला नामांतराचे गाजर दाखविण्यापेक्षा शासनाने संबंधित समाजाची अनेक वर्षाची प्रलंबित मागणीची पुर्तता करावी, त्यांना एस.टी. वर्गात समाविष्ट करावे ते समाज हिताचे ठरेल. वास्तविक नामांतराच्या केंद्राच्या काही मार्गदर्शक सुचना आहेत त्यापैकी सर्वात प्रमुख सुचना म्हणजे ” ज्या शहाराच्या नावाला काही ऐतिहासिक वारसा असेल तर त्या ऐतिहासिक शहराचे नाव बदलता येणार नाही.” अशी स्पष्ट सुचना असुनही आयुक्तांने सदर घाईघाईने बेकायदेशिर प्रस्ताव पाठविला. अहमदनगर या नावाला आतापर्यत शहराचे आमदार, खासदार तसेच स्थानिक राजकिय पक्ष तसेच कोणत्याही नगरसेवकांचा विरोध नसतांना देखिल नामांतराचा विषय रेटला जात असुन यात राजकीय हेतु दडला आहे.म्हणून जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महाराष्ट्र,
प्रदेश अध्यक्ष समाजवादी पार्टी तथा आमदार
अबुआसिम आजमी यांना समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबीद हुसैन यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली आहे.
तसेच पुण्यश्लोक आहिल्यादेवींच्या त्यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान व आदर असुन त्यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे. परंतु 534 वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करु नये ही मागणी ही करण्यात आली आहे.
अन्यथा या विरोधात कायदेशिर मार्गाने वेगवेगळे आदोंलन उभारले जाईल. वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई ही देऊ असे आबीद हुसैन व शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles