Saturday, March 2, 2024

राज्यात गुंडागिरीचे राज्य गुंडांचे बॉस हे राज्याचे गृहमंत्री, नगरमध्ये संजय राऊतांचे टीकास्त्र

अहमदनगर येथे आज रविवारी शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी संजय राऊत भाषणात म्हणाले की, अनिल भैय्या राठोड यांच्याप्रमाणे सर्व शिवसैनिकांनी नगरमध्ये काम केलं पाहिजे. अनिल भैय्या असते तर नगर शहरातील गुंडगिरीशी संघर्ष केला असता असे सर्वजण मला सांगतात. नगरमधील ताबेमारी आणि गुंडगिरी विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोर्चा निघेल. या शहरातील आमदार असेल की खासदार, कुणी कुणाचा व्याही असो की साडू असो सर्वांची गुंडगिरी मोडून काढू, अशी टीका त्यांनी यावेळी शिवाजी कर्डीले आणि संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता केली. शिवसेनेचा जन्मच गुंडगिरीतून झाला आहे. तुमचा “संग्राम” असेल तर आमचा “महासंग्राम” आहे. असाही टोला त्यांनी संग्राम जगताप यांना लाग्वाला.संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गुंडागिरीचे राज्य चालू असून या गुंडांचे बॉस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. अहमदनगर शहरातील गुंडगिरी लवकरच शिवसेना संपवणार, असा निर्धार आम्ही केला असल्याचेदेखील संजय राऊत म्हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles