Monday, April 22, 2024

अजय महाराज बारस्करांचा त्यांच्याच सावेडी ग्रामस्थांकडून निषेध,गावकऱ्यांनी घेतला ठराव…

मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलणारे अजय महाराज बारसकर यांना त्यांच्याच गावातून विरोध होतांना पाहायला मिळत आहे. अहमदनगरच्या सावेडी ग्रामस्थांच्या वतीने अजय बारसकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

मनोज जरांगे यांचे आंतरवाली आमरण उपोषण सुरु असतानाच बारसकर यांच्याकडून त्यांना पाणी पिण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, जरांगे यांनी बारसकरांना व्यासपीठाच्या खाली व्हा असे सांगून तेथून काढून दिले. त्यानंतर बारसकरांनी जरांगे यांच्याविरोधात भूमिका घेतली. मागील काही दिवसांत सतत पत्रकार परिषदेतून त्यांनी जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, जरांगे यांच्यावर आरोप करणाऱ्या बारसकरांना त्यांच्या मुळगाव सावेडी विरोध होतांना पाहायला मिळत आहे.

सावेडी हे अजय महाराज बारसकरांचे मूळ गाव आहे. मात्र, त्यांच्या याच मूळगावातून त्यांना विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्याची सावेडी येथील गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे. गावकऱ्यांनी बारसकरांचा निषेध देखील केला आहे. तसेच, बारसकरांची भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यांच्या याच भूमिकेला सावेडी गावचा विरोध असल्याचा दावा देखील गावकरी करत आहेत. विशेष म्हणजे सावेडी येथील गावकऱ्यांनी ठराव घेत अजय महाराज बारसकरांचा निषेध केला आहे. सावेडीच्या विठ्ठल रुक्मणी मंदिरात हा ठराव घेण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles