कॅफेच्या नावाखाली शाळा-कॉलेजच्या मुला -मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार्या सावेडीतील एका कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. याप्रकरणी पोलीस अंमलदार सतीष त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून कॅफेचा मालक सागर अशोक उदमले (वय २८ रा. हिवरेझरे ता. नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड रस्त्यावरील एका हॉटेलच्या जवळ एका गाळ्यात प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार करून शाळा- कॉलेजच्या मुला- मुलींना अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, डि. बी. जपे, गंगा बोडखे यांच्या पथकाने दुपारी साडेबाराच्या सुमारास मनमाड रस्त्यावरील झेड. के. कॅफेसमोर छापा टाकला. या कॅफेत प्लायवुडचे कंम्पार्टमेंट करून, पडदे लावुन अंधार केलाला दिसला व त्यात काही मुले व मुली अश्लिल चाळे करताना मिळून आली.
पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलवून त्यांच्या समोर समज देऊन सोडून दिले. कॅफेचा मालक सागर उदमले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .