Saturday, October 5, 2024

नगर लोकसभेसाठी शिवसेनेकडे शंकरराव गडाख यांच्या रूपाने सक्षम उमेदवार, बड्या नेत्याचे सूतोवाच

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिर्डी येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. याचवेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघावर राऊत यांनी मोठे भाष्य केले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार यांच्याकडे आहे. जागा बदलून मिळण्याच्या कोणत्याच गोष्टीवर चर्चा झाली नाही. परंतु शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख हे प्रबळ, सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles