Saturday, October 12, 2024

डॉ. विखेंचा पराभव, अन्‌ माझाही पराभव ! नेमकं काय म्हणाले शिवाजीराव कर्डिले

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे मुद्दे आणि प्रचार वेगळा असतो. लोकसभेचे गणित विधानसभेला चालेल, असे काही म्हणता येणार नाही. एक गोष्ट सांगतो, की यावेळी सर्वाधिक म्हणजे बारापैकी दहा आमदार हे महायुतीचे असतील, इतकेच मी सांगतो. या निवडणुकीत जिल्ह्याची समिकरणे बदललेली दिसतील. कोणत्याही परिस्थितीत मी राहुरीतून लढणार आहे आणि जिंकणार आहे, असा विश्र्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्राच्या चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. नगर जिल्ह्याला मोठा निधी मिळू शकला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्राच्या योजना राबविण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. पंतप्रधान सडक योजना, जलसंधारणाची कामे, पाणी योजना अशा अनेक योजना आम्ही यापूर्वी मतदारसंघात राबविल्या. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला.
माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या पराभवामागे संपर्क ठेवत नाहीत, फोन घेत नाहीत, अशी कारणे देत विरोधक टीका करतात. पण मी तर सर्वांच्या संपर्कात असतो, फोन घेतो आणि २५ वर्षे आमदार होतो. प्रत्‍येकाच्या सुख-दुःखाच्या कार्यक्रमांना उपस्थित असतो. मग माझा २०१९ मध्ये पराभव का झाला? पराभवाची अनेक कारणे असतात, हे लक्षात घ्यायला हवे. एकाच कारणामुळे पराभव झाला असे म्‍हणता येणार नाही. डॉ. सुजय विखेंचाही संपर्क चांगलाच होता. खासदार म्‍हणून त्‍यांची कामगिरी उत्तमच होती. केवळ संपर्कामुळे त्‍यांचा पराभव झाला, अशी टीका होते, हे चुकीचे आहे, असे मला वाटते, असेही कर्डिले म्‍हणाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles