माजी खासदार सुजय विखे-पाटील यांनी राहुरीतून लढण्याचा मनोदय व्यक्त केल्याने माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, या सगळ्याबाबत कार्डिले यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे. त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसेच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असेही कर्डीले म्हणाले. दरम्यान श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. याच मतदारसंघातून शिवाजी कर्डीले यांचं नाव समोर येत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शिवाजीराव कर्डिले म्हणतात , मला पैलवानकीचा छंद आहे… पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघात लढण्यास तयार…
- Advertisement -