Thursday, July 25, 2024

नगर लोकसभा निवडणुकीतील विखेंच्या पराभवाचा रिपोर्ट लवकरच केंद्राकडे जाणार ..!

नगर – भाजपाच्या पक्ष निरिक्षक खा.मेघा कुलकर्णी या नगरमध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांनी बुधवारी सायंकाळी भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांच्या सावेडी येथील संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी श्री.गंधे व सौ.मीनल गंधे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी उपस्थित भाजपाच्या पदाधिकार्‍यांशी खा.कुलकर्णी यांनी चर्चा केली. झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीचे निरोप शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांना जाणूनबुजून देण्यात न आल्याची तक्रार यावेळी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी खा.कुलकर्णी यांच्याकडे करत अनेक तक्रारींचा पाढा त्यांच्या पुढे वाचला. यावेळी खा.कुलकर्णी यांनी पदाधिकार्‍यांच्या भावना समजून घेतल्या. खा.मेघा कुलकर्णी म्हणाल्या, आता लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. नगरमध्ये जरी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी न थांबता येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपा विरोधात अपप्रचार करत नागरिकांच्या मनात खूप मोठ्याप्रमाणात संभ्रम निर्माण केले आहेत. त्यामुळे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नागरिकांशी जास्तीत जास्त संपर्क साधून त्यांच्या मनातील भाजप बद्दलचे संभ्रम व विरोधकांनी केलेला अपप्रचार दूर करण्यासाठी काम करावे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा मी घेतला असून लवकरच तो केंद्राकडे सादर करणार आहे. शहरातील पदाधिकार्‍यांच्या भावना समजून घेतल्या आहेत. महेंद्र गंधे म्हणाले, मी पक्षाचा शहर विधानसभा निवडणूक प्रमुख असूनही लोकसभा निवडणूकीच्या आढावा बैठकीचे निमंत्रण मला नव्हते. त्यामुळे मी आजच्या बैठकीला उपस्थित नव्हतो. निरीक्षक खा.मेघा कुलकर्णी यांना सर्व परीस्थितीची माहिती आहे. त्यामुळे त्यांना नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यांचे पुण्यातील पक्षाचे संघटनात्मक काम खूप उत्कृष्ट आहे. त्यामुळेच भाजपने त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल केले आहे. नगरच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी एकदिवस नगरसाठी द्यावा, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी शहर भाजपाचे बाबासाहेब सानप, वसंत राठोड, संतोष गांधी, लक्ष्मिकांत तिवारी, किशोर कटोरे, चंद्रकांत पाटोळे, शशांक कुलकर्णी, सागर भोपे, सुमित बटुळे, नितिन जोशी, श्रीकांत फंड, अमोल निस्ताने, राहुल रासकर, अजिंय गुरवे, दिलीप भालसिंग, कालिंदी केसकर, श्वेता झोंड, सुजाता औटी, हुजेफा शेख, अ‍ॅड.ऋग्वेद गंधे आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles