Wednesday, April 17, 2024

नगर शहरातील विठ्ठाई उद्योग समुहाचे संचालक सुरेश गाडळकर यांचे निधन

नगर – टिळकरोड, गाडळकर मळा, काटवण रोड येथील विठ्ठाई उद्योग समुहाचे संचालक सुरेश शंकरराव गाडळकर यांचे आज दि.6 रोजी सकाळी दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्यावर नालेगांव अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.सुरेश गाडळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, दोन भाऊ, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते धार्मिक व मनमिळावू स्वभावाचे होते. ते नाना या नावाने सर्वत्र परिचित होते. नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांचे वडिल तर चंद्रकांत गाडळकर यांचे मोठे बंधू होत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles