अहमदनगर येथील बांधकाम मजूर असलेले विजय निवृत्ती धुमाळ ह्रदयविकाराने पीडित होते. त्यांचे ह्रदय पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना ह्रदय प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. मात्र, ह्रदय प्रत्यारोपणाचा ₹23 लाखांचा खर्च न परवडणारा असल्याने धुमाळ कुटुंबिय चिंतेत होते. त्यांच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आर्थिक मदतीची विनंती केली.
त्यांचा उपचार करण्यात आला, मदत करण्यात आली.
विजय धुमाळ यांच्या पत्नी विद्या धुमाळ यांनी कृतज्ञता व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर राखी बांधून त्यांचे आभार मानले!
नगरच्या बांधकाम मजुरासाठी देवेंद्र फडणवीस ठरले देवदूत….
- Advertisement -