Wednesday, February 28, 2024

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदेच ठरले… राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया…

राहाता : आजच्या निकालामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज सायंकाळी व्यक्त केली.

निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी आमदारांचे अभिनंदन करून मंत्री विखे म्हणाले की, हा निकाल देताना नोंदवलेली निरीक्षण खूप म्हत्त्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे उलट तपासणीला सामोरे जावू शकले नाहीत, यावरूनच त्यांची स्वत:बद्दलची आणि पक्षाबदलची उदासीनता किती होती, हे स्पष्ट होते. निकालमुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच ठरले आहेत. केवळ चुकीचे प्रवक्ते आणि सल्लागारांमुळे ठाकरे यांना सर्व गमवावे लागले. सत्ता होती तेव्हाही आणि गेल्यानंतरही त्यांचा फक्त थयथयाट सुरू होता. यामुळे त्यांचा चेहरा उघडा पडला असल्याचे सांगून शरद पवार आता त्यांना सुप्रिम कोर्टातच नाही तर त्यापेक्षाही मोठ्या कोर्टात जायला सांगतील. कारण सत्तेचा डाव मांडायचा आणि नंतर पाठीत खंजीर खुपसायचे, असेच राजकारण त्यांचे आजपर्यंत आपण पाहिले असल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles