नगर : राहुरी मतदारसंघातील विकासकामांच्या श्रेयावरून आ.प्राजक्त तनपुरे यांनी खा.सुजय विखे पाटील यांना टोला लगावला आहे. आ.तनपुरे यांनी सोशल मिडियावर खा.विखे यांच्या कार्यक्रमाचा फोटो पोस्ट करीत विखेंना उद्घाटनवीर असे म्हणत टोला लगावला आहे.
आ.तनपुरे यांनी म्हटले आहे की,
याला म्हणतात आयत्या पीठावर रेघा ओढणे !!!
ज्या रस्त्याची प्र. मा. आमच्या सरकारच्या काळात झाली (1 एप्रील 2022), तुमच्या सरकारने टेंडर काढायला वर्ष घातलं, विधानसभेत मी लक्षवेधी लावल्यावर तुम्ही टेंडर उघडलत, तुमच्या मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळालं नाही म्हणून तुम्ही ठेकेदारावर दबाव आणून त्याला काम चालू करू देत नाही, मला नगर मनमाड हायवेवर रास्तारोको करावा लागला आणि वर टोपी करत तुम्ही उद्घाटन करताय !
ज्यांच्यामुळे काम सुरू व्हायला तब्बल दीड वर्ष उशीर लागला, असे उद्घाटनवीर फोटोत दिसताहेत. काहींना माजी झाले तरी फुकट नारळं फोडण्याची हौस जात नाही.