कौशल्य विकास व रोजगार समितीमध्ये
विनायक देशमुख निमंत्रित सदस्य
———————————
नगर: “राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी श्री सिद्धराम सालीमठ यांन श्री.विनायक देशमुख यांची “जिल्हा कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता ” समितीच्या निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती केली आहे.”
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत रोजगार व स्वयंरोजगार सहाय्यक संचालक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, MIDC चे विभागीय अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी, लिड बॅंकेचे जिल्हा प्रमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, आदिवासी विकास, जिल्हा अल्पसंख्याक विकास अधिकारी यांचा समावेश आहे.
श्री. विनायक देशमुख हे मेकॅनिकल इंजिनिअर असुन १९८२ ते १९९४ या काळात त्यांनी क्राॅम्प्टन ग्रीवज लि. या कंपनीत त्यांनी अभियंता म्हणून काम केले आहे.कौशल्य विकास व प्रशिक्षण श्रेत्रात त्यांचा २० वर्षांपेक्षा जास्त काळ अनुभव आहे.
पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर कौशल्य विकास योजना हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून जास्तीत जास्त युवकांना कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी करुन घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे श्री.देशमुख यांनी सांगितले.
” कौशल्य विकास” या महत्वपूर्ण विषयांत काम करण्याची संधी दिल्याबद्दल श्री. देशमुख यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा यांचे आभार मानले आहेत.