Sunday, June 15, 2025

Ahmednagar news :पर्यावरण संतुलनासाठी ‘लक्ष्यवेध’ कडून वृक्षारोपण मोहीम

पर्यावरण संतुलनासाठी ‘लक्ष्यवेध’ कडून वृक्षारोपण मोहीम
विविध सामाजिक उपक्रमांचेही करणार आयोजन
नगर – नगर व पुणे जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘लक्ष्यवेध’ मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या वतीने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम सुरु करण्यात आली असून या सोबतच ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रमही राबविले जाणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन महेश भोर यांनी दिली.
या मोहिमेचा शुभारंभ शिंदेवाडी, घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संतुलन, वृक्षारोपणाचे महत्व या विषयी जनजागृती करून करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन महेश भोर,संचालक सुभाष आरडे, आकाश ढगे, प्रदीप जगताप, शाखा व्यवस्थापक नंदू थिटे, रोहित कोळपे, किरण नाणेकर, रवींद्र उबाळे, कालिदास निंभोरे, दिनेश सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते रमेश शिंदे, महेश पानसरे (पाटील), माजी उपसरपंच विष्णु खामकर, योगेश पानसरे, शिक्षिका सौ. सुवर्णा निंभोरे, सौ. सुनीता सोनवणे, संजय रायकर, सौ. सोनाली रणदिवे आदी उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन महेश भोर ‘लक्ष्यवेध’ संस्थेच्या नगर जिल्ह्यातील नगर, श्रीगोंदा, पारनेर तालुक्यात तसेच पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासह अन्य ठिकाणी शाखा असून संस्थेने नागरिकांचा विश्वास संपादन केल्यामुळे संस्थेच्या ठेवीदारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जनतेच्या आर्थिक गरजा भागविण्याबरोबरच सामाजिक उपक्रमातही संस्थेच्या वतीने योगदान दिले जात आहे. पर्यावरणाचा ढासळलेला समतोल राखण्याची आज नित्तांत गरज असून त्यामुळे संस्थेने वृक्षारोपण व संवर्धनाची मोहीम सुरु केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles