Saturday, May 18, 2024

अहमदनगर निलेश लंकेचा बॅनर निकालाआधीच झळकला….

लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाले असून ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. तथापि उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचा उमेदवार विजयी झाला असल्याचे सांगत श्रीगोंदा शहरात शनी चौक येथे खासदार मिळायचा नाय निलेश लंके साहेबांसारखा.साहेब पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. अशा आशयाचे बॅनर लावण्यात आला आहे मतदान टक्केवारीचा फायदा कोणाला याची चर्चा होत असून त्यावरून श्रीगोंदा तालुक्यात पैजा ही लागल्या आहेत.
तालुक्यामधील जनतेमध्ये आमचाच उमेदवार विजयी होणार अशी चर्चा केली जात आहे. परंतु निकाल कोणाच्या बाजूने लागेल हे कोणालाच सांगता येत नाही. चार जून रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यावेळेसच कळन खासदार पदाचे दावेदार कोण. अशी चर्चा तालुक्यातील काही जनतेमध्ये चालू आहे. श्रीगोंदा शहरातील शनि चौक येथे निलेश लंके यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. त्यावर त्यांच्या पुढील भावी वाटचालीस – हार्दिक शुभेच्छा देणाऱ्या संदेश देण्यात आला आहे या बॅनरची तालुक्याभर जोरदार चर्चा होत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दुरंगी लढत झाली खरा सामना हा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्यामध्ये होता. गेले महिनाभर जोरदार प्रचार सुरू होता त्यामुळे या मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. निलेश लंके यांना मफलीस ग्रुप तर्फे पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles