Saturday, May 18, 2024

निलेश लंके यांच्याकडे नेमकी संपत्ती किती? समोर आली आकडेवारी…

नगर : नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी आमदार नीलेश लंके यांच्याकडे जंगम व स्थावर अशी एकूण ४२ लाख ५४ हजार ४३६.५२ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांची पत्नी राणी लंके यांच्या नावावर केवळ २ लाख ७८ हजार २८४.३५ रुपये किंमतीची जंगम मालमत्ता आहे. तर मुले तेजस व शिवम या दोघांच्या नावावर अनुक्रमे ११ हजार ५६९ व १० हजार २७१ रुपये आहे. संपूर्ण लंके कुटुंबाकडे ३५ लाख ५४ हजार ५६१.६७ रुपयांची संपत्ती आहे.

सन २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना नीलेश लंके यांनी दाखवलेल्या मालमत्तेच्या तुलनेत त्यांच्या एकूण संपत्तीत ३१ लाख ३७ हजार २३८ रुपये घट झाली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार लंके यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.

सन २०१९ मध्ये पारनेर विधानसभा निवडणूक लढवताना त्यांची जंगम मालमत्ता ५८ लाख ५६ हजार ५२१ रुपये होती. ती सध्या, सन २०२४ मध्ये कमी होऊन २३ लाख ३२ हजार २२६ रु. किंमतीची झाली आहे. स्थावर मालमत्ता २०१९ मध्ये १५ लाख ३५ हजार १५३ रुपयांची होती. तर आता सन २०२४ मध्ये १९ लाख २२ हजार २१० रुपये झाली आहे. लंके यांच्या नावावर ३७ लाख ४८ हजार ७५७ रुपयांचे कर्ज आहे. सन २०१९ मध्ये ३२ लाख २८ हजार ९८९ रु. होते. लंके यांच्याकडे १३ लाख ५ हजार ८०० रुपयांचे वाहन असून १४ लाख ७ हजार १०० रुपये किंमतीचे सोने आहे. पत्नी राणी लंके यांच्या नावावर केवळ जंगम मालमत्ता आहे. सन २०१९ मध्ये १ लाख ५८ हजार ७३५ रुपये होती.

आता सन २०२४ मध्ये २ लाख ७८ हजार ३८४.३५ एवढी झाली आहे. १ लाख १९ हजार ५४९ रुपयांची ही वाढ आहे. त्यांच्याकडे वाहन नाही. २ लाख ६ हजार २५० रुपये किमतीचे सोने आहे. मुलगा तेजस लंके याच्या नावावर ११ हजार ५६९ व शिवमच्या नावावर १० हजार २७१ रुपये बँकेत ठेव आहे. नीलेश लंके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक) येथून बीएचे शिक्षण पूर्ण केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles