Wednesday, April 17, 2024

निलेश आपका काम अच्छा है, ऐसेही लोगोकी सेवा करते रहो…. निलेश लंकेंना जैन साधूंचे आशीर्वाद

निलेश आपका काम अच्छा है, ऐसेही लोगोकी सेवा करते रहो…. निलेश लंकेंना जैन साधूंचे आशीर्वाद

नगर – आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताच निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी नगर शहरात गाठीभेटी वाढवल्या आहेत. लंके यांनी आनंदधाम येथे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, दत्ता जाधव,मनीषशेट गुगळे,किसनलाल बेदमुथा,विशाल वालकर,रोशन गांधी,उमेश भांबरकर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी लंके यांनी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदन ऋषीजी महाराज, पूज्य आदर्शऋषीजी महाराज, पूज्य आलोकऋषीजी महाराज तसेच आनंदधाम येथे विराजमान साधू साध्वीजींचेही आशीर्वाद घेतले. पूज्य कुंदन ऋषीजी महाराज यांनी निलेश लंके यांना आशीर्वाद दिले. निलेश आपका काम अच्छा है, ऐसेही लोगोकी सेवा करते रहो अशा शब्दांत लंके यांना आशीर्वाद दिले. लंके यांनी करोना काळात कोविड केअर सेंटर उभारून तब्बल 33 हजार रूग्णांना सेवा दिली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे जीव वाचवले. हजारो कुटुंबांना आधार दिला. याच कार्यामुळे पूज्य कुंदन ऋषीजी महाराज प्रभावित झाले. हेच सेवा कार्य अखंडपणे चालू ठेवा असा सल्ला त्यांनी दिला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles