Tuesday, January 21, 2025

Ahmednagar निलेश लंकेंनी जाहीर केला एक्झिट पोल…म्हणाले…

अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी मोठा दावा केला आहे. तब्बल दोन लाखांच्या फरकाने निवडून येणार, असे त्यांनी म्हटले आहे.

मला 100 टक्के विश्वास आहे की, निवडणुकीचा निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली तेव्हा मी जाहीर केले होते की मी दोन लाखांच्या फरकाने विजयी होणार आहे. मी आजही माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.
इतर उमेदवारांसारखे आपले आकडे कमी होत नाहीत, तर वाढतच आहेत. कारण सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे असं म्हणत निलेश लंके यांनी अप्रत्यक्षरीत्या त्यांनी सुजय विखे पाटील यांना टोला लगावलाय. निवडणूक झाल्याबरोबर आपण इतरांप्रमाणे आराम करण्यासाठी कुठे गेलो नसून जनतेसोबत असल्याचं म्हणत माझं दैनंदिन काम सध्या देखील सुरू असल्याचं त्यांनी म्हटल आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles