जामखेड -खासदार डॉ. सुजय विखे यांनी जिल्ह्यात विकास कामाला महत्त्व न देता दाळ साखर वाटली त्यांनी पाच वर्षांतील कामाचा लेखाजोखा मांडावा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूकीला सामोरे जावे जिल्ह्यात किती उद्योग आणून तरुणांच्या हाताला काम दिले हे सांगून मते मागावीत, इंग्लिश भाषा येते का म्हणून आम्हाला हिणवू नका असा घनाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केला.
जामखेड (प्रतिनिधी – नासीर पठाण )
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी खासदार होणारच आणि जामखेडला रेल्वे आणणारच विजयाची पहिली सभा जामखेड मध्ये घेऊ असे सांगितले.
लोक निलेश लंकेला नोटभी और वोटभी देतात तुम्हाला काम करणारा खासदार हवा की इंग्रजी बोलणारा हवा असेही सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रेची आज सुरूवात सकाळी खर्डा येथे झाली व समारोप जामखेड मध्ये जाहीर सभा घेऊन झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, काँग्रेसचे शहाजीराजे भोसले, राहुल उगले, माजी सभापती सुर्यकांत मोरे, संजय वराट, राजेंद्र पवार, राजेंद्र कोठारी, शहाजी राळेभात, शरदचंद्र गटाचे युवक शहरध्याक्ष वसीम सय्यद ; कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल बेदमुथ्या ; सुरेश पवार ; संदीप गायकवाड ; हनुमंत पाटील ;सुरेश भोसले, वैजनाथ पोले, काँग्रेसचे सरचिटणीस कुंडल राळेभात, प्रशांत राळेभात, दिगांबर चव्हाण ;अमित जाधव, प्रा. विकी घायतडक, अभय शिंगवी, प्रकाश सदाफुले, रमेश आजबे ;सचिन शिंदे, प्रविण उगले, बाबासाहेब उगले, युवराज उगले, बाबासाहेब मगर, भानुदास बोराटे, प्रकाश काळे, राजेंद्र गोरे, भिमराव लेंडे पाटील, बप्पा काळे, हरीभाऊ बेलेकर, नय्युम शेख यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, इंग्रजी येत नाही हा प्रचाराचा विषयच नाही. विकासाचे मुद्दे महत्त्वाचे आहेत. कांदा प्रश्न लोकसभेत मांडावयास हवा होता. तो मांडला नाही. महायुतीचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. कांदा, दुधाचे भाव पडले आहेत.
मागच्या दाराने आलेले शिंदे आमदार यांना विकासाचे काही देणे घेणे नाही. फक्त आपल्या विकास कामाला स्थगिती आणण्यात पटाईत आहेत. कोरोना काळात बंगल्यातील झाडांना पाणी घालत होते.
शहराची पाणी योजना आपणच पाठपुरावा केला होता सर्व मंजुरी मिळवली पण शिंदे यांनी मुद्दाम एक वर्ष विलंब केला यामुळे आज शहरातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघातील जनतेने मला लढावयाचे शिकवले आहे. एम आय डी . संदर्भात आमदार राम शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला .
शिंदे यांनी आपल्या एमआयडीसी ला स्थगिती आणून नवीन एमआयडीसी वनविभागाच्या जागेत आणली आहे. ती होणार नाही आपण मंजूर केलेली एमआयडीसी एका महिन्यात कोर्टाकडून निकाल येणार आहे. असही पवार म्हणाले .
यावेळी काही प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात झाले. नायगाव येथील वयोवृद्ध शेतकरी
बाबासाहेब उगले यांनी निलेश लंके यांना निवडणूक खर्च म्हणून दहा हजार रुपये निवडणूक निधी दिला .