Sunday, December 8, 2024

नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शिवालयात गुढी उभारुन कापड बाजार परिसरातून प्रचारफेरी

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी विजयाची गुढी उभारुन करण्यात आला. लंके यांच्या प्रचारार्थ शहरात काढण्यात आलेल्या फेरीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत स्व. अनिलभैय्या यांच्या मावळ्यालाच आमचे मत अशा भावना व्यक्त केल्या.

नीलेश लंके यांच्या प्रचाराचा शुभारंभ नगर शहरातील नेता सुभाष चौक येथे विजयाची गुढी उभारुन करण्यात आला. याप्रसंगी जि.प.सदस्या राणीताई लंके, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर, काँग्रेसचे किरण काळे, युवा सेनेचे विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, गिरिष जाधव, संजय शेंडगे, अशोक गायकवाड, अमोल येवले, अरुणा गोयल, प्रशांत गायकवाड, मनोज गुंदेचा, अशोकराव बाबर, नामदेव पवार, सुदाम भोसले, दिघे अण्णा, अनिस चुडिवाल, विलास उबाळे, आकाश आल्हाट, उषा भगत, रोहिदास भालेराव, सुनिता भांबरे, उमेश भांबरकर, सचिन ढवळे, आसाराम कावरे, सुनिल त्रिपाठी, अशोक दहिफळे, संतोष गेनप्पा, दिपक खैरे, दिलदारसिंग बिर आदिंसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरमध्ये सेवा, संरक्षण हे मुद्दे घेऊन स्व.अनिलभैय्या राठोड यांनी सलग २५ वर्ष या शहराचे नेतृत्व केले. त्यांनी शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेले नगर शहर सक्षमपणे सांभाळले. नागरिक निर्भय होते. राठोड यांच्या पश्चात त्यांचे शिलेदार असलेले नीलेश लंके हे नगर दक्षिण मतदार संघाचे नेतृत्व करणार असून आम्ही अनिल राठोड यांचा विचार मानणारे सर्वसामान्य लोक लंके यांनाच पसंती देणार असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून देत उत्तेरेच पार्सल आपल्याला परत पाठवाचे आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठकारे यांचा हिंदूत्वाचा व समानतेचा नारा दिला. नगर शहरात स्व.अनिल राठोड यांनी २५ वर्षे आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा केली. लोकसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणून नगर दक्षिण लोकसभेवर महाविकास आघाडीची विजयाची गुढी उभारायचीच व उत्तरतेतील प्रस्थापितांचे पार्सल आपल्या येथून हुसकावून लावायचे असा निर्धार करुन कामाला लागा असे आवाहन शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.

अभिषेक कळमकर म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार नेत्रदिपक कामगिरी करुन मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होणार आहेत. नीलेश लंके यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीसह शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस, आपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत. नगर दक्षिणेतून नीलेश लंके हे सर्वसामान्यांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने त्यांना मोठे मताधिक्क्य मिळेल असा विश्वास कळमकर यांनी व्यक्त केला.

किरण काळे म्हणाले, नगर दक्षिणच्या विद्यमान खासदाराने गेल्या पाच वर्षात मतदार संघासाठी काहीही केले नाही. ते निवडून दक्षिणतून येतात आणि विकास उत्तरेत करतात. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना भरघोस मतांनी निवडून देऊन निष्क्रय खासदाराला पुन्हा उत्तरेत पाठवावे असे आवाहन केले. लंके यांच्यामागे जनताच उभी राहिली आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांच्या विजयासाठी कंबर कसली असल्याची पुष्टी काळे यांनी जोडली.

शिवालय येथे विजयी गुढी उभारल्यानंतर नवीपेठ, अर्बन बँक रोड, कापड बाजार, मोची गल्ली, सराफ बाजार, दाळ मंडई, आडते बाजार आदि परिसरातून प्रचारफेरी काढण्यात आली. त्यास व्यापारी, व्यवसायिक, नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles