Friday, June 14, 2024

निलेश लंकें यांच्या आईचे खळबळजनक आरोप ,म्हणाल्या माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी….

अहमदनगर- भाजपच्या सुजय विखे-पाटील यांच पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. निलेश लंकेंनी अहनगरनध्ये मोठा उलटफेर केला. या निकालानंतर लंकेच्या आईंनी खळबळजनक आरोपे केले आहेत.निवडणूक काळात माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असून मोठी पूजा घातल्याच लंके यांच्या आईने म्हटले आहे. तर निवडणूक काळात मोठी धास्ती वाटत होती कारण हे मोठे लोक आहेत मशीन मध्ये घोटाळा करू शकतात अशी चर्चा होती, एवढंच नाही तर कुठे अपघात व्हावा यासाठी मोठ मोठ्या पूजा घालण्यात आल्या असल्याचा खळबळजनक आरोप लंके यांच्या आई शकुंतला लंके यांनी केला आहे.

अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखे-पाटील तर मविआकडून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आलं होतं. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार होते. तर लंके विद्यमान आमदार, शरद पवार गटाकडून उभे असलेल्या निलेश लंके यांनी विखेंचा पराभव करत विजयश्री मिळवला. ग्रामपंचायतपासून सुरू झालेला लंके यांचा प्रवास आता खासदारकीपर्यंत पोहोचला आहे शरद पवार गटाकडून उभे राहिलेल्या निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा 29 हजार 317 मतांनी पराभव केला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles